School Closed या जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुट्ट्या जाहीर
School Closed : राज्यात सध्या पावसाचा जोरवाढला आहे. पुण्यासह परिसरात देखील हीच परिस्थिती असून गेल्या 48 तासात पुण्याच्या काही भागात अतिवृष्टी झाली. अशात येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात पुन्हा अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने लोणावळा, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली, खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळांना आज 25 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. या बाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश दिले आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पुण्यासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे परिसराती नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यात खडकवासला धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण पुर्ण भरले आहे. धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या मुसळधार पावसामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचलेल आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती
School Closed पुण्यात बुधवार सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. तर जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला. खडकवासला धरण परिसरात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीच वाढ होत धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. तरी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे आज पहाटपासूनच खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यानुसार, सध्या 40,000 क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग मुठा नदी पात्रात केला जात आहे. या विसर्गामुळे सिंहगड रस्त्यावरील नदीपत्रालगत असणाऱ्या काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. तर पुण्यातील भिडे पूल देखील पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक ही वळवण्यात आली आहे.