Heavy Rain in Maharashtra : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाला सुरुवात
Heavy Rain in Maharashtra पुण्यात मुसळधार पावसाने अनेक छोटे-मोठे पूल पाण्याखाली पुण्यात झालेल्या पावसामुळे अनेक छोटे आणि मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. पुण्यातील बहुतांश अंडरपास सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून वाहतूक कोंडी आणि इतर दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे.
पुण्यात मुसळधार पावसाने अनेक छोटे-मोठे पूल पाण्याखाली
पुण्यात झालेल्या पावसामुळे अनेक छोटे आणि मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. पुण्यातील बहुतांश अंडरपास सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून वाहतूक कोंडी आणि इतर दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
कण्हेर, वीर धरणातून विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
साताऱ्यात मुसळधार पाऊस सुरु असून कण्हेर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. कण्हेर धरणातून 5 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर वीर धरणातून 13 हजार 900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती
Heavy Rain in Maharashtra मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून राज्यातील अतिवृष्टी आणि मदतकार्याचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अद्याप पाऊस सुरूच आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ताथवडे परिसरात अनेक घरात पाणी शिरलं आहे.अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. ते स्वत: जिल्ह्यात उपस्थित राहून बचाव आणि मदतकार्याचे नेतृत्वं करणार आहेत.