AC Jugaad चक्क टेबल फॅनला बनविला 10,000 हजार रुपया वाला AC जुगाड पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क
AC Jugaad सध्या देशभरात गरमीचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. लोकं वाढत्या तापमानामुळे अक्षरश: हैराण झाले आहेत. जो तो आतुरतेने पावसाची वाट पाहतोय. दरम्यान या धगधगत्या उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी एका तरुणानं खतरनाक जुगाड केला. त्यानं दोन प्लास्टिकच्या डब्यांपासून चक्क AC तयार केलाय. होय, असा अतरंगी जुगाड तुम्ही यापूर्वी कधीच पाहिला नसेल. साधारणपणे एका एसीची किंवा कूलरची किंमत ही १५ ते २० हजार रुपये इतकी असते. पण तरुणानं तोच AC प्लास्टिकच्या डब्यांपासून तयार केलाय. हा अतरंगी जुगाड पाहून तुम्ही देखील अवाक् व्हाल. (फोटो सौजन्य – electricianamitsaini/Instagram)
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
AC Jugaad सर्वात आधी दोन प्लास्टिकचे डबे घेतले. या डब्यांमध्ये गवत भरलं. मग हे गवत भरलेले डबे दोन पाईपच्या मदतीनं पाण्याच्या बादलीशी जोडले. आणि शेवटी हा पूर्ण सेटअप एका टेबल फॅनवर जोडला. आणि अशा पद्धतीनं तयार झाला जुगाडू AC. आता प्रश्न असा आहे हा AC काम कसा करतो? तर, पंखा सुरू होताच बादलीमधील पाणी वर खेचलं जातं आणि प्लास्टिकच्या डब्यांमार्फत पंख्यातील हवेमध्ये मिक्स होतं. आणि त्यामुळे पंख्यामधून बाहेर पडणारी हवा AC सारखी गार जाणवते. हा जुगाड करण्यासाठी तुम्हाला थोडी पार तांत्रिक कसरत करावी लागेल हे खरं, पण तुम्ही अगदी २००-३०० रुपयांत हजारो रुपयांचा AC चा अनुभव घेऊ शकता.