गणेशउत्सव निमित नागरिकांना मिळणार मोफत आनंदाचा शिधा या दिवशी पासून होणार वाटप Anandacha Shida Latest


शेतकरी व्हाट्सअप ग्रुप

Join Now

Anandacha Shida Latest  आनंदाचा शिधा वाटपासाठी सरकारची मोठी घोषणा: गणेशोत्सवानिमित्त राज्यातील नागरिकांना सरकारकडून खास आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेला हा शिधा वाटप आता सुरू होणार आहे.

या उपक्रमासाठी सरकारने जवळपास ५६२ कोटी रुपयांची मंजूरी दिली आहे. याबद्दलचा शासन आदेश राज्यातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने काढला आहे.

आनंदाचा शिधा कसा मिळणार?
गणेशोत्सव सणानिमित्त हा आनंदाचा शिधा नागरिकांना १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत ई-पास प्रणालीद्वारे मिळणार असून, त्यासाठी केवळ १०० रुपये द्यावे लागणार आहेत. या माध्यमातून द्रारिद्य्ररेषेखालील केशरी शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांना सवलतीच्या दरात आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

देण्यात येणाऱ्या आनंदाच्या शीध्याची माहिती:
नागरिकांना यंदा एक किलो चणाडाळ, साखर व एक लिटर सोयाबीन तेल असा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे.

कोणाला मिळणार आनंदाचा शिधा?
राज्यातील अत्योदय अन्न योजना आणि प्राधान्यक्रम कुटुंब शिधापत्रकांना या आनंदाच्या शीध्याचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील द्रारिद्य्र रेषेखालील केशरी रेशनकार्ड असणाऱ्यांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. एकूण सुमारे 1,70,82,086 शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा वाटप करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

आनंदाच्या शिध्याचा एकूण खर्च:
आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी अंदाजे ५४३.२१ कोटी आणी त्यासाठीचा इतर खर्च १९.३ कोटी खर्च असा एकूण ५६२.५१ कोटी इतका प्रस्तावित खर्च करण्यास मान्यता मिळाली आहे. या खर्चामध्ये आनंदाच्या शीध्यासाठी लागणारा माल खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारा कालावधी देखील कमी करण्यात आला आहे.

गणेशोत्सव सणासाठी राज्य सरकारने आनंदाचा खास शिधा नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जवळपास ५६२ कोटी रुपयांचा खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अत्योदय अन्न योजना व प्राधान्यक्रम कुटुंब शिधापत्रकांसह द्रारिद्य्र रेषेखालील नागरिकांना या शिध्याचा लाभ मिळणार आहे. या माध्यमातून राज्यातील एकूण १ कोटी ७० लाख ८२ हजार नागरिकांना लाभ देण्यात येणार आहे.

Similar Posts