Electricity Bill या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटींची वीजबिल माफी

Electricity Bill राज्य सरकारने शेतीपंपांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय जाहीर केला, पण अद्याप शासन निर्णयाची प्रतीक्षाच आहे. राज्य शासनाने अधिवेशनात घोषणा केल्याने त्यासंबंधीचा शासन निर्णय निघेल म्हणून ‘महावितरण’ने एप्रिल ते जून या तीन महिन्यातील बिलाचे प्रिंटिंग थांबविण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात तीन लाख ९२ हजार शेतकऱ्यांकडे कृषीपंप आहेत. त्यापैकी अवघे २५ हजार

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

शेतकरी नियमित वीजबिल भरतात आणि उर्वरित शेतकऱ्यांकडे वीजबिलाची थकबाकी आहे.राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार जिल्ह्यातील जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना

साडेचार हजार कोटींची वीजबिल माफी मिळेल, अशी स्थिती आहे. दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी अशा संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याच्या वीजबिल माफीचा निर्णय पावसाळी अधिवेशनात झाला, पण त्याचा शासन निर्णय अजून निघालेला नाही. पण, शासनाकडून कडून या आठवड्यात निर्णय निघेल म्हणून तीन महिन्याच्या बिलिंगची छपाई ‘महावितरण’ने थांबविली आहे. दरम्यान, एकदा वीजबिल माफी झाल्यानंतर पुन्हा मात्र नियमित

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Electricity Bill वीजबिल भरावे लागणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, त्यांना रात्रीचा त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शासकीय व खासगी जमीन घेतली जाणार असून आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात मिळालेल्या दोन हजार ७० हेक्टर जमिनीवर सौर पॅनल टाकले जाणार आहेत. दिवसा वीज सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना नियमित वीजबिल भरावे लागणार आहे.

Similar Posts