IMD Rain Alert : पुढील काही तासांत या जिल्ह्यात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल, हवामान खात्याने अलर्ट जारी केला

IMD Rain Alert राज्यात विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. काही भागात मुसळधार तर कुठे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे देखील पाहायला मिळत होतं तर राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे संपूर्ण बातमी पाहूया.

मुंबई सह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून संत धार पावसाला सुरुवात झालेली आहे.

मुंबई शहरापेक्षा उपनगरात जास्त पाऊस झाला असल्याचा सांगण्यात येत आहे.

या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुंबईमध्ये उद्या कमाल तापमान 35 डिग्री सेल्सियस तर किमान तापमान २२ डिग्री सेल्सियस असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील तीन दिवस पुण्याचा महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय पुण्यात उद्या कमाल 30 डिग्री सेल्सियस आणि किमान 20 डिग्री सेल्सियस तापमान असेल विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय तर पूर्व विदर्भात अद्याप दमदार पावसाची प्रतिक्षात असल्याचे चित्र आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात अजूनही उकाडा जाणवत असून पावसाची प्रतीक्षा कायम आहे त्यांना नागपूरमध्ये उद्या कमाल 35 डिग्री सेल्सियस आणि किमान 27 डिग्री सेल्सिअस तापमान असेल.

IMD Rain Alert अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला तर संभाजीनगर या ठिकाणी उद्या कमाल 32 डिग्री सेल्सियस आणि किमान 27 डिग्री सेल्सिअस तापमान असेल राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे काही भागात पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी अस आवाहन केलं जात आहे.

Similar Posts