Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात नेमकं काय हमीपत्र कसं भरून अपलोड करायचं पहा संपूर्ण माहिती

Majhi Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार असून, त्यांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला, मुलींनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान माझी लाडकी बहीण (Majhi Ladki Bahin Yojna) या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार महिलेला एक हमीपत्र द्यावे लागणार आहे. हे हमीपत्रात (Self Certificate) नेमकं काय आहे? आणि हे हमीपत्र नेमकं कसं भरून अपलोड करायचं आहे? हे जाणून घेऊयात.

हमीपत्र म्हणजेच सेल्फ सर्टीफिकेट, या हमीपत्रावर सही करताना ते काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. सर्व अटी समजून घेऊनच त्यावर सही करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे? त्यासाठीचे हे हमीपत्र आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

हे ही वाचा : Pipani Symbol Freeze : शरद पवारांना मोठा दिलासा, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

हमीपत्र कसं भरायचं?

माझ्या कुटुंबाचे एकत्रिक वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रूपयांपेक्षा अधिक नाही.

माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी.

माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही.

Majhi Ladki Bahin Yojana मी स्वत: किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियम/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही.

मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी/ स्वयंसेवी कामगार/ कंत्राची कर्मचारी असून माझे उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा 1500 रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.

माझ्या कुटुंबातील सदस्य विद्ममान किंवा माजी खासदार/ आमदार नाही.

माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/ कॉर्पोरेशन/ बोर्ड/ उपक्रमाचे अध्यक्ष/ उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत.

माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत.

माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती

Majhi Ladki Bahin Yojana या हमीपत्रातील 10 मुद्दे वाचून तुम्हाला त्याच्यासमोर दिलेल्या बॉक्समध्ये बरोबरची खूण करायची आहे. तसेच त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि सही करायची आहे. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला या हमीपत्राचा फोटो काढून तो नारीशक्ती दूत अॅपमधील अर्जदाराच्या हमीपत्राच्या कॉलममध्ये अपलोड करायचा आहे.

Similar Posts