मराठवाड्यात भूकंप ! भूकंपाचा पहिला थरारक व्हिडीओ समोर

Marathwada Earthquake

हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज पहाटे 7:15 च्या सुमारास सर्वदूर भूकंपाचा धक्का जाणवला आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाला आहे. हिंगोली शहरालासुद्धा या भूकंपाचा धक्का जाणवला असून या भूकंपाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सध्या समोर आलेले सीसीटीव्ही फुटेज 19 सेकंदांचे आहे. या 19 सेकंदांत धरणीकंप कैद झालेला आहे.

मराठवाडा आणि विदर्भात भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटेच्या भूकंपामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ताज्या माहितीनुसार, भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र काही महिन्यांपूर्वीही मराठवाड्यातील काही भागात असाच भूकंप झाला होता. यानंतर पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भूकंपाच्या स्थितीचे वर्णन करणारा व्हिडिओ हिंगोली जिल्ह्यातून समोर आला आहे. या व्हिडिओवरून भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज लावला जात आहे.

Similar Posts