Msrtc free pass : महिलांना अर्ध्या तिकिटावर बस प्रवास निर्णयामध्ये मोठा बदल;
Msrtc free pass : नमस्कार एसटी महामंडळ नागरिकांना यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात शिंदे फडणवीस सरकारने महिलांसाठी एक विशेष योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आता तिकीट दरात 50 टक्के सवलतीने एसटीमध्ये प्रवास करता येणार आहे. जरी या योजनेचे अर्थसंकल्पात घोषणा झाली असेल तरीदेखील याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 17 मार्च 2023 पासून शिंदे फडणवीस शासनाने सुरू केली आहे. म्हणजेच आज या योजनेला सुरवात होऊन चार दिवस झाले आहेत.
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Msrtc free pass “महोत्सवी ज्येष्ठ नागरिक एसटीतून मोफत प्रवास करतात. दरमहा ६५ ते ७० कोटी रुपये मिळतात. सध्या एसटीतून दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात आणि विविध योजनांमुळे महामंडळाला दिवसाला (प्रतिपूर्ती रक्कमेसह) २२ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. त्यातून अडचणीतील लालपरीचा प्रवास सुरू आहे. आता राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार परिपत्रक निघाल्यानंतर महिलांना प्रवास दरात ५० टक्क्यांची सवलत लागू होईल. त्याचाही मोठा आधार लालपरीला मिळणार आहे.msrtc free pass
लालपरीची सद्यःस्थिती
सध्या दररोज सरासरी ५०-५५ लाख प्रवासी करतात लालपरीतून प्रवास., एकूण प्रवाशांमध्ये अंदाजे ३० टक्के म्हणजेच १६ ते १७ लाख महिला प्रवासी., १२ वर्षाखालील मुलींना आणि ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत., राज्यातील ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना प्रवासात १०० टक्के सवलत., महामंडळाचा दरमहा सरासरी खर्च ८५० कोटी व उत्पन्न ७२० कोटींपर्यंत आहे.
Msrtc free pass एसटीने प्रवास न करणाऱ्या महिला सध्या पर्यायी वाहनांचा वापर करतात. अनेक नोकरदार स्त्रिया स्वतःची दुचाकी अथवा चारचाकी घेऊन ये-जा करतात. काही महिला वडाप, अॅटोरिक्षातून जातात. तर अनेकजण कुटुंबासोबत खासगी वाहनाचा वापर करतात. त्या महिला आता एसटीकडून ५० टक्के सवलत मिळणार असल्याने लालपरीतून प्रवास करतील. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला भरघोस उत्पन्न मिळेल आणि अडचणीतील लालपरीची स्थिती सुधारेल, असा विश्वास महामंडळाला आहे.”