PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा लाभ आता बायकोलाही मिळणार? जाणून घ्या नियम

4.1/5 - (7 votes)

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात  सहा हजार रुपये जमा केले जातात.   दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात.  

याचा फायदा शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित किरकोळ खर्च काढण्यासाठी होतो . भारत सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा  लाभ थेट शेतकरी कुटुंबांना होतो. जर कुटुंबातील पती पत्नी दोघेही शेतकरी असेल तर या योजनेचा लाभ दोघांना घेता येतो का? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. मात्र या योजनेचा फायदा कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला घेता येणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकरी कुटुंबासाठी चालवली जाते. पती-पत्नी दोघेही शेतकरी असले तरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान पोर्टलवरील नियमावलीमध्ये याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.  या योजनेमध्ये शेतकरी कुटुंबातील एकच व्यक्ती नोंदणी करू शकते.

यासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींनी नोंदणी केल्यास ती रद्द केली जाते. दुसरीकडे, या योजनेचा लाभ दोन्ही लोकांना मिळत असेल, तर सरकार ते केव्हाही रिकव्हर करू शकते. गेल्या वर्षभरात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ही प्रकरणे बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहेत. एकाच कुटुंबातील दोन सदस्य सन्मान निधीचे हप्ते घेत असतील, तर सरकार नोटीस पाठवते आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येते.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेशी देशातील आठ कोटीहून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत. सध्या पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची पडताळणी सुरू आहे. देशातील सर्वात मोठ्या योजनांपैकी ही एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील अल्पभूधारकर शेतकऱ्यांना दरवर्षी टप्प्याटप्यानं आर्थिक लाभ दिला जातो. चार महिन्यांच्या अंतारने शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात.

असे पाहा पीएम किसान योजनेचे स्टेट्स 

13व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यात येतील की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल. येथे तुम्हाला Farmer Corner चा पर्याय दिसेल. आता तुम्ही त्यातील लाभार्थी स्थितीवर क्लिक करा. त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाइल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक नमूद करावा लागेल.

Share this:
Close Visit Havaman Andaj