Ration card आचारसंहितेत अडकलेली साडी अंत्योदय रेशन कार्ड लाभार्थ्यांना पुरवठा विभागाकडून वाटप सुरू

Ration card लोकसभा निवडणुकीपूर्वी शासनाकडून अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबांना साडीवाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात साडीवाटप करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, १६ मार्च रोजी आचारसंहिता लागू झाल्यामुळे साडीवाटप थांबवण्यात आले होते. ते वाटप आता सुरू झाले असून, पुढील एक ते दोन आठवड्यांत सर्व साड्यांचे वाटप होईल, अशी शक्यता आहे.

शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ जाहीर करण्यात आले होते. या धोरणानुसार अंत्योदय रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना यंत्रमागावर विणलेली प्रतिकुटुंब एका साडीचे मोफत वाटप करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.

आता उर्वरित वाटप सुरू

आचारसंहितेमुळे रखडलेले साडीवाटप जिल्हा पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी वाटप करण्यात येणारा संपूर्ण साठा पुरवठा विभागास लोकसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच उपलब्ध झाला होता.आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर वाटप सुरू करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

रेशन दुकानदारांना सूचना

Ration card शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी साडीवाटपास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, आचारसंहिता शिथिल झाली असल्याने साडी वाटप करण्याच्या सूचना दिल्या

Similar Posts